Outreach Programs


आनंदघरच्या कामाचे अनेक पैलू आहेत, त्यात रोजचे उपक्रम, विविध शिबिरं, प्रशिक्षण सत्र, स्नेहसंमेलन इत्यादी आहे. याविषयीची आणखी माहिती वेबसाईटवर इतरत्र दिलेली आहे. त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे तो म्हणजे आऊटरिच प्रोग्रॅम्स (outreach programs). आनंदघरच्या कामाची दखल घेऊन विविध संस्थांनी व्याख्यानासाठी, चर्चेसाठी, कॉन्फरन्ससाठी, प्रशिक्षणासाठी, सल्लामसलतीसाठी निमंत्रित केलेलं... तसेच, बाहेरच्या जगातल्या विविध व्यक्ती, संस्था यांनी आनंदघरी येणं हे गरजेचेही आहे, आणि आमच्या आनंदाचा भाग आहे... ही देवाण-घेवाण मुलांसहित आमच्या सर्वांच विश्व समृद्ध करते.....

Invited by Bharat Gyan Vidyan Samiti (BGVS), Nira- Purandhar, Pune- November, 2016 (Mr. Paresh  Jayashree Manohar, Mrs. Sameeksha)

On the Occasion of Child Rights Day 20 November, 2016, Bharat Gyan Vidyan Samiti (BGVS, Nira-Purandhar, Pune, Maharashtra) invited Adv. Chhaya Golatgaonkar (Director, Aanandghar) as a speaker on the topic "Child Rights". The session was good and more interactive...

BGVS संस्था लोकशाही रुजवून, विचारप्रवृत्त करायला लावणारे कार्यक्रम गेली अनेक वर्षे सातत्याने आयोजित करत आहे. २० नोव्हेंबर २०१६, बालहक्क दिनाच्या निमित्ताने भारत ज्ञान विज्ञान समिती (पुरंधर, पुणे) ह्या संस्थेनं अँड छाया, संचालक-आनंदघर यांना "मुलांचे अधिकार आणि मोठ्यांच्या जबाबदाऱ्या" या विषयावर बोलण्यासाठी निमंत्रित केलेलं...

Contributed for "Palakniti" Magazine on Parenting, July 2017-Issue, Authored Two articles on Child care and Law and Policy... (Pune) (Dr. Sanjivani Kulkarni, Mrs. Priyamvada Barbhai)

"Palakniti" is a magazine on Parenting active since 20 years. The July 2017 is a special issue focuses on the important topic relating to day care (Child Care) centers. Two articles authored by our founder-director were published in "Palakneeti". One article explains the concept of Aanandghar and the other focuses on child care and law, and policy.

"पालकनीती" हे मासिक गेल्या २० वर्षांपासून पालकत्व ह्या विषयावर कार्यरत आहे. जुलै २०१७ च्या पाळणाघर विशेषांकमध्ये पाळणाघर (बालसंगोपन केंद्र) ह्या विषयावर भर होता. आनंदघरच्या संस्थापक ह्यांनी लिहिलेले दोन लेख ह्या अंकामध्ये प्रसिद्ध झाले. एका लेखाचा विषय "आनंदघर" ची संकल्पना आणि दुसऱ्या लेखाचा विषय हा "बालसंगोपन, कायदा आणि धोरणं" असा होता.

Invited by Anandvan for training and discussion on Child Care and Education- October 2017 (Warora, Chandrapur) (Dr. Sheetal Amte, Mrs. Pallavi Amte)

Anandvan and team came to know about Aanandghar Child Care, Learning and Research Centre and they invited us to work on education system at Anandvan, Chandrapur, Maharashtra. During the visit from 16 th to 25 th October 2017, studied various projects of Anandvan, we exchanged ideas on education. Out of detailed study, observations, meetings, discussions, submitted Proposal and Report to Anandvan.

आनंदवन महारोगी सेवा समिती, चंद्रपूर- सामाजिक संस्था- अभ्यास दौरा (ऑक्टोबर २०१७) आनंदघरचे काम बघून आनंदवन अभ्यास दौऱ्यासाठी आमंत्रित केलं गेलं. याविषयीचा सविस्तर अहवाल दिला.

Invited for Study tour and Paper Presentation at International Conference, CCE, Tampere, Finland- November 2018 (Mrs. Shirin Kulkarni, Mr. Heramb Kulkarni)

Study tour and Paper presentation at 6th International Symposium and Conference at CCE, Tampere, Finland. 12 to 16 Nov. 2018 on Methodology, pedagogy, philosophy used at Aanandghar. The topic was- "Creativity, Brain and Art: with special reference to Aanandghar Child Care, Learning and Research Center"

कौंसिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन, CCE, तांपेरे, फिनलंड ही संस्था - सात वर्षांपासून शिक्षणात क्रिएटिव्हिटीचे महत्त्व या विषयात कार्यरतआहे. या संस्थेकडून आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्ससाठी आमंत्रित केलं गेलं. आनंदघर- एक संकल्पना, विचार, कार्यपद्धती, तत्व, यावर पेपर प्रेझेंटेशन केलं.

Invited by Khelghar (खेळघर) Pune (Mrs. Shubhada Joshi, Mrs. Sushma Yardi, Mrs. Sandhya)

"Khelghar"- an organisation working since 20 years in Pune with Children from downtrodden section (slum area.) Adv Chhaya, Director at Aanandghar, invited as a speaker on the topic "Juvenile Offenders and Law and society"

"खेळघर" २० वर्षांपेक्षा जास्त काळापासून वस्तीवरच्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे. बालगुन्हेगारी, कायदा व समाज" या विषयावर बोलण्यासाठी, चर्चेसाठी adv छाया, संचालक आनंदघर, निमंत्रित करण्यात आलं.

Parent Teacher Training : Invited by St. John School, Pulgaon, Wardha (Mrs. Priti Borase)

Training is the core of Aanandghar's work. We conduct various parent-teacher training sessions at Aanandghar itself as well as other schools and various residential societys too.
Invited to conduct continuous teacher parent training program by St. John School, Pulgaon, Wardha.

आनंदघरच्या कामाचा आत्मा म्हणजे प्रशिक्षण. प्रशिक्षणाशिवाय काम उत्तम दर्जाचे होऊ शकत नाही असं आम्ही मानतो. म्हणूनच आनंदघरी व बाहेर - शाळांमध्ये सोसायट्यांमध्ये प्रशिक्षण वर्ग घेत असतो. पुण्यात व पुण्याबाहेर हे पालक शिक्षक प्रशिक्षण वर्ग चालू असतात.

© Copyright 2020 Aanandghar - All Rights Reserved